Manoj Jarange यांचं निर्जळी उपोषण,सरकारचा दुसरा जीआरदेखील नाकारला, सरकारची कोंडी : ABP Majha
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज १४वा दिवस आहे. जरांगे यांनी कालुासून पाणी प्राश करणं बंद केलंय, तसंच सलाईनही काढून टाकलंय. वैद्यकीय उपचार देखील ते घेत नाहीयेत. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत. यामुळेच त्यांनी राज्य सरकारचा दुसरा जीआर देखील फेटाळला आहे.
मराठा समाजाने गावोगावी शांततेनं साखळी उपोषण करावं, असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय.