Manoj Jarange Health Update : मनोज जरांगेंची तब्येत आणखी खालावली, पाणीही घोटेना

Continues below advertisement

Manoj Jarange Patil Health Update : आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती अतिशय नाजूक (Manoj Jarange Patil Health News) असल्याची चिंताजनक बाब आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram