Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके

Continues below advertisement

Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके जरांगेंच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या असून इथल्या व्यवस्थेने मराठा समाजामध्ये आणि तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केलीय, दरम्यान मनोज जरंगे यांनी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी बैठका लावल्याचा आरोप देखील केलाय, यावेळी लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर टीका करत, पवार निवडणुका जिंकण्याचे फक्त मॅनेजमेंट गुरु असून त्यांनी इथले लोक सोबत घेतले असते तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलय.    आज 8 वा दिवस काल कलेक्टर येऊन गेले , शासन अजून कुठ   मराठा समाजातील उपेक्षित घटक हा फक्त इकॉनॉमिकल मागास आहे,   आरक्षण एक केवळ सामाजिक मागासांचा प्रतिनिधित्व करत आहे    मराठा समाजातील तरुण पोरांना माझी विनंती आहे की शासनाकडून योजना घेऊ शकतात पॉलिसी घेऊ शकतात.      जरांगेंच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केलेले आहेत मात्र इथली व्यवस्था आणि प्रतिनिधी या तरुणांना समजून सांगत नाही हे  सामाजिक मागासांच आरक्षण आहे म्हणून,  तरुणांच्या मनातला संभ्रम दूर केला पाहिजे,   जरांगे  फक्त तुलना करत आहे तुमची पोरं नोकरी लागतात आमची का लागत नाही आम्ही कधी आमचा माणूस आमदार नाही खासदार नाही म्हणून तुलना केली का?  तुमच्या जमिनी गेल्या म्हणता आणि बाराबलुतेदारांकडे जमिनी तरी आहेत का ?सातबारा तरी आहे का?    जरांगे तू यार लोकसभेला तू पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी बैठका घेतल्या   गेल्या 78 वर्षात धनगरांचा एक ही खासदार झाला नाही तरी त्या महादेव जानकर यांचा पराभव करण्यासाठी तू बैठका घेतल्या.  प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांना तुझे मत  झाले नाही   तुमचे 56 मोर्चे ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा म्हणून तुम्हीच मागणी केली होती ?  भंपक माणसाच्या मागे जनता कशाला जाईल काय योगदान आहे त्यांचं ?  प्रकाश आंबेडकरांची आणि शेतकरी नेत्यांची हयात गेलेली आहे   जरांगे सारख्यांनी तरुणांच्या मनात भ्रम निर्माण केलेला आहे...   अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बनिग्रोची गुढग्यावर बसून माफी मागितली होती,  जगातल्या सुपर पॉवर बद्दल निग्रो बद्दल त्यांची ही भावना असेल तर माझ्या देशातल्या इथल्या राज्यकर्त्यांची दलित भटक्या नुकतांबद्दल काय भावना असायला हवी?    ऑन शरद पवार  शरद पवार यांना आम्ही जाणता राजा म्हणायचो पण आता ते निवडणुका जिंकायचे फक्त मॅनेजमेंट गुरु ,   पहिलं शरद पवार लक्ष्मण माने ना. धो महानोहर यांच ऐकायचे मात्र आता काही ऐकत नाही ,त्यांनी इथल्या लोकांना बरोबर घेतल असत तर ते कधीच पंतप्रधान  झाले असते.  आता शरद पवारांच्या खासदारांमध्ये किती मराठा खासदार आहेत एक दोन आहेत ते फक्त नावालाच आहेत त्यातील एक तर महाराजांची भूमिका केली म्हणून खासदार झाले.  आठ पैकी त्यांचे किती ओबीसी उमेदवार आहेत, जे आहे ते फक्त नावाला आहेत.    शासनाचे मंत्री केवळ वैयक्तिक मला भेटायला आले होते हे मला नंतर कळले, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram