Jalna Samarth Ramdas News : समर्थ रामदासांचे देव चोरणारे २ दिवसांनंतरही मोकाटच

सोमवारी पहाटे जालन्यातील जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या.... समर्थ रामदासस्वामी ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच मूर्ती चोरट्यांनी पळवल्यात... या घटनेला २ दिवस झालेत.. मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही..  त्यामुळे जांबसमर्थ गावातील ग्रामस्थ आणि मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक आक्रमक झाले.. ग्रामस्थ आणि भाविक आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.. चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करुन मूर्तींचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांनी केलीय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola