Jalna Kidnapping Case : पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटका
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna Kidnapping Case : पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटका
ब्रेकिंग -जालना-शाळकरी मुलाचे अपहरण करून 5 कोटींची खंडणी मागितली.
पोलिसांकडून 7 तासात अपहरणकर्ते तीन आरोपी अटकेत
काल सकाळी शाळेत जाताना मुलाचे तीन आरोपींनी अपहरण केले होते, संध्याकाळी पोलिसांनी पाठलाग करून समोरून गाडी आडवी लाऊन पकडले, एक्सकल्युजिव व्हिडिओ.
जालना शहरात काल शाळेमध्ये जाणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, काल सकाळी माहिती मिळाल्यानंतर दिवसभर पोलिसांकडून शोधा शोध सुरू होती पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान शहरातील मोंढा परिसरामध्ये सदर आरोपी या मुलाला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावेळी साने गुरुजी शाखेच्या पथकाने पाठलाग करत आरोपींच्या कार समोर दुचाकी आडवी लाऊन आरोपींना ताब्यात घेतलं आणि मुलाची सुटका केली.