Jalna OBC Sabha : ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांचा जोरदार हल्लाबोल
Jalna OBC Sabha : ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांचा जोरदार हल्लाबोल
जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्यात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकजूट दाखवत जोरदार हल्लाबोल केला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवलाय. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रासपचे महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, देवयानी फरांदे, प्रकाश शेंंडगे असे वजनदार ओबीसी नेते व्यासपीठावर उपस्थित होते. आम्हाला धमक्या द्यायल तर पदापेक्षा समाजासाठी लढू असा एल्गार वडेट्टीवारांनी केला. तसंच जातनिहाय जनगणना करण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करू असं वडेट्टीवार म्हणाले. तर भुजबळांनी भाषणातून मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला. आमदारांना मंत्र्यांना गावबंदीचे फलक तातडीने निघाले पाहिजेत अशी मागणी भुजबळांनी सरकारकडे केली. सरकारने पक्षपात केला तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही असा इशारा भुजबळांनी दिला.