Jalna Drought : दुष्काळामुळे जालन्यातील शेतकरी संकटात, मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Jalna Drought : दुष्काळामुळे जालन्यातील शेतकरी संकटात, मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
दुष्काळाची दाहकता जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही संकटात टाकू लागलीय. जीवापाड जपलेल्या मोसंबीच्या बागेवर दुष्काळामुळे कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. तर मोसंबी च्या या करपलेल्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी...
गोंदियाच्या पालेवाडा गावात भीषण पाणीटंचाई जाणवतेय. या गावात जलक्रांती व्हावी म्हणून ९५ लाखांचा खर्च केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाहीये. घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. जीवन मिशन योजनेअंतर्गत पालेवाडा गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आलं.. एक विहीरही खोदण्यात आली.. मात्र चुकीच्या जागेला विहीर खोदल्याने जानेवारीतच विहिरीचं पाणी आटलं.. शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज गावाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतायत.. आता गावाजवळच असलेल्या कलपाथरी मध्यम प्रकल्पावर पाण्याची योजना पुन्हा सुरु करावी अशी मागणी करण्यात येतेय.