Jalna Crime : धक्कादायक! पत्नीसह झालेल्या वादातून पित्यानं घेतला दीड वर्षीय मुलीचा जीव ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून मुलांच्या अपहरणाच्या अफवा पसरवल्या जातायत.. आणि याचाच फायदा जालन्यात एका नराधम पित्यानं घेतलाय... जालन्यातील निधोना शिवारात मुले पळवणाऱ्या टोळीनं आपल्या मुलीचं अपहरण झाल्याचा बनाव पित्यानं केला... यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर हा सगळा बनाव असून पत्नीबरोबर झालेल्या वादातून पित्यानेच आपल्या दीड वर्षाच्या मुलीचं अपहरण करत हत्या केली... आरोपी जगन्नाथ डकले याला पोलिसांनी अटक केली आहे....