Jalna Vijay Zol : तरुण उद्योजकाला जीवे मारण्याची धमकी, Arjun Khotkar यांच्या जावयावर गुन्हा दाखल

अंडर १९चे माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय... तरुण उद्योजकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. जालन्यातील घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला... क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली ज्यात या करन्सीची मार्केटस व्हॅल्यू घसरल्यानं आपल्याला त्यात दोषी धरुन क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावानं घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केलीय.. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटर विजय झोल त्यांचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल केलाय..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola