Jalna Antarwali Hunger strike : अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसीचं आंदोलन, शिंदे समिती रद्दाची मागणी
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटी गावाच्या वेशिवर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झालाय.. आज पासून अंतरवाली सराटी गावच्या मुख्य रस्यावरील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय...मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, शिंदे समिती रद्द करून कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं बंद करावं यासह इतर मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आलंय..