Jalna : घुंगर्डे हदगाव येथील शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, केंद्रेकरांची शिफारस मंजूर करण्याची मागणी
Continues below advertisement
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सरकारकडे केलेली शिफारस मंजूर करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलंय,मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये अनुदान देण्याची शिफारस केंद्रेकर यांनी सरकारकडे केली होती, त्याला अनुसरून या शेतकऱ्यांनी कालपासून आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. दरम्यान या मागणीसह
शेतकऱ्यांना लागवडीसाठी दहा हजार रुपयाची मदत करावी, अतिवृष्टी अनुदान तात्काळ देण्यात यावं अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केलीये.
Continues below advertisement