Protestor in Jalna : फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा आंदोलकांकडून आंदोलकाचा सत्कार
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्याचा जालन्यात सत्कार करण्यात आला. पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र पोलिसांकडून सुटताच त्याचा सत्कार करण्यात आला. जालना इथे वंदे भारत एक्स्प्रेसच्या शुभारंभासाठी येत असलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्याला मराठा आरक्षणासाठी काळे झेंडे दाखवले. यावेळी विष्णू घनगाव या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. मात्र पोलीस स्टेशनमधून सुटताच त्याचा सत्कार करण्यात आला.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Devendra Fadnavis Jalna Maratha Protestor 'Maharashtra Devendra Fadnavis Convoy