Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात, टेम्पो पलटून 16 मजुरांचा मृत्यू
जळगाव : जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश मृतक हे रावेर तालुक्यातील असल्यानं तालुक्यावर शोककळा पसरली आहे.