Navneet Rana on Asaduddin Owaisi : तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील मला 15 सेकंद पुरे,ओवैसींना इशारा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavneet Kaur Rana : अमरावतीमधील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. 2013 मधील अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका विधानावरून ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली. “आम्हाला 15 मिनिटे नाही, तर 15 सेकंद लागतील”, असे त्या म्हणाल्या. राणांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं, “मी तुम्हाला 15 सेकंद नाही, तर 1 तास देतो, तुम्ही काय करू शकता सांगा?” असं ते म्हणाले. नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरुन सध्या राजकारण तापले आहे. यावरुन विरोधकांनी टीकेचा भडीमार केलाय. पण नवनीत राणा यांनी विरोधकांना उत्तर देताना, आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलेय.
नवनीत राणा काय म्हणाल्या ?
मी कुणालाही घाबरत नाही. माझ्या वक्तव्यावर मी नेहमीच ठाम राहिलेली आहे. ओवैसी यांनी 15 मिनिटं फक्त पोलिसांना हटवून आम्हाला द्या असं म्हटलं होतं. पण हा हिंदुस्थान आहे, जे लोक हिंदू विचारधारेचे आहेत, त्यांना 15 सेकंदच लागतील.