Jalgaon NCP |  Dr Satish Anna Patil  आणि Gulabrao Deokar अजित पवारांच्या पक्षात?,शरद पवार पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्र वादी शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्याच्या नंतर पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये मोठी मरगळ आल्याचं पाहायला मिळत आहे अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना,पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागते की काय अशी परिस्थिती असल्याने,अनेक कार्यकर्त्यांना आपण सत्ताधारी पक्षात असायला हवे अशी भावना आहे याच भावनेतून जळगाव जिल्ह्यातील राष्ट्र वादी पक्षाचे दोन माजी मंत्री हे लवकरच अजित दादा पवार  यांच्या  राष्ट्रवादी पक्षात जाण्याचे संकेत मिळत आहेत.  माजी मंत्री डॉ सतीश पाटील आणि माजी मंत्री गुलाराव देवकर अशी या दोघा माजी मंत्र्यांची नावे असल्याची सूत्रांची माहिती आहे विरोधात असल्याने कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने ,कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन ,आणि त्यांच्या समवेत विचार विनिमय करून या बाबत आपण निर्णय घेणार असल्याचं डॉ सतीश आण्णा पाटील यांनी म्हटल आहे.  जळगाव जिल्ह्यात या दोघंही माजी मंत्र्यांचं मोठ नेटवर्क असल्याने ,या दोघा नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्या सह  राष्ट्रवादी अजित दादा यांच्या पक्षात प्रवेश केला तर, एन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठ खिंडार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola