Jalgaon मध्ये Gulabrao Patil आणि Abdul Sattar यांच्यात नाराजी नाट्य : ABP Majha
बातमी मंत्री गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्या जळगावातल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याची. जळगाव कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शिंदे समर्थक असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. पण अब्दुल सत्तार पोहोचण्यापूर्वीच गुलाबराव पाटलांनी उद्घाटन उरकल्याने सत्तार नाराज झाले. त्यातही सत्तार यांचं भाषण सुरू असतानाच गुलाबराव पाटील व्यासपीठावरून पुढच्या बैठकीसाठी निघून गेले. त्यानंतर सत्तार यांनी त्यांच्या भाषणात याबाबत नाराजी व्यक्त केली.... आपल्याला येरागबाळ्यात काढले अशा शब्दात सत्तार यांनी गुलाबरावांवर आगपाखड केली.