Jalgaon District Bank Election :शिवसेना, काँग्रेसचा पाठिंबा, राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदावाराचा विजय
Jalgaon District Bank Election :शिवसेना, काँग्रेसचा पाठिंबा, राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदावाराचा विजय
जळगाव जिल्हा बँकेत बंडखोरी करत राष्ट्रवादी पक्षाचे संजय पवार हे अध्यक्षपदावर जाऊन पोहोचल्या नंतर मंत्री गुलाबराव पाटील आणि आ मनगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत आम्ही कोणताही गाजावाजा केला नाही ,मात्र जनतेचा कौल काय होता हे या निवडणुकीतून कळाले आहे,मात्र सहकारात राजकारण नको या विचाराचे आपणही असल्याने जिल्ह्याच्या विकाससाठी
पुढील काळात बँक चालविणे साठी आम्ही एकनाथ खडसे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेणार आहोत ,या निवडणुकीत कोणी तरी विकासाचा अदृश्य आत्मा आला आणि या मध्ये हा संजय पवार यांचा विजय झाला आहे,राष्ट्रवादी.मधील नाराज लोकांनी साथ दिल्याने पवार हे विजयी झाले आहे.