Jalgaon : जळगाव येथे शिवकालीन नौका आणि गड किल्ल्यांचं प्रदर्शन
Jalgaon : जळगाव येथे शिवकालीन नौका आणि गड किल्ल्यांचं प्रदर्शन उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय. यानिमित्त जळगावमध्ये विविध उपक्रम राबविले जातायत. या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील युद्ध नौका आणि गड किल्ले यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आलंय. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या युद्ध कलेचा इतिहास हा प्रत्येकापर्यंत पोहोचावा हे या प्रदर्शनाचं प्रमुख उद्दीष्ट आहे.