Jalgaon : नेपाळमध्ये गेलेले जळगावातील 80 नागरिक बेपत्ता

Continues below advertisement

Jalgaon : नेपाळमध्ये गेलेले जळगावातील 80 नागरिक बेपत्ता

भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातील 80 जण नेपाळ येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी खैरनी नदीमध्ये एक बस कोसळून अनेक जणांचा मृत्यू  झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र आपल्या परिवारातील लोक सुखरुप आहेत की नाही याची माहिती अजून या परिवाराला मिळाली नाहीये.  नेपाळ बस दुर्घटनाप्रकरणी (Nepal Bus Accident)  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी  केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत संवाद साधला आहे. वायूसेनेच्या विमानाने आज  27 जणांचे मृतदेह महाराष्ट्रात आणणार आहे.   नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला अपघात झालाय.  बस नदीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 40  जण होते. नेपाळमधल्या पोखरा शहराकडून काठमांडूला जाताना हा अपघात झाला आहे.  मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव परिसरातले आहेत.  हे प्रवासी 16 ऑगस्टपासून देवदर्शनाला गेले होते.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram