Gulabrao Patil on Bhimashankar : देव सगळीकडे, देवावर राजकारण करू नये ABP Majha
Continues below advertisement
Maharashtra Pune News : पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यातील भीमाशंकर (Bhimashankar)... पण आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम (Aasam) सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं (Assam Tourism Department Office) यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे.
Continues below advertisement