Eknath Khadse : राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक?
Continues below advertisement
राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळतेय. राज्यात कार्यक्रम घेऊन एकनाथ खडसेंना सोबत घ्या असे केंद्राकडून सांगण्यात आलं. मात्र राज्यातील तीन वरिष्ठ नेते याबाबत उदासीन असल्याची माहिती आहे. याचं कारण म्हणजे खडसेंना आताच भाजपमध्ये घेतलं तर निवडणुका सुरू असताना गटातटाचं राजकारण सुरू होईल, त्यामुळे निवडणुकीनंतर प्रवेश सोहळा करू अशी राज्य भाजपची भूमिका असल्याचं कळतंय.
Continues below advertisement