Eknath Khadse Andolan : जळगाव दूध संघातील चोरी प्रकरणात गुन्हा नोंदवा, एकनाथ खडसेंचं आंदोलन
जळगाव दूध संघात झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हा नोंद करावा म्हणून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय. या प्रकरणी नऊ तास पाठपुरावा केल्यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून घेतला असला तरी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे खडसे यांनी कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय.