Jalgaon : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सची ईडीकडून चौकशी सुरु
Continues below advertisement
ईडीच्या साठ जणांच्या पथकाने जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी सुरू केल्यानं सुवर्णनगरी जळगावमध्ये खळबळ उडालीय. गुरुवारी संध्याकाळी सुरू झालेली चौकशी आज पहाटे ४ पर्यंत सुरू होती. त्यानंतर सर्व अधिकारी परतले. मात्र थोड्याच वेळात पुन्हा झाडाझडती सुरू होण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेकडून घेतलेलं कर्ज आणि थकीत कर्जाबाबत ईडी चौकशी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादसह विविध जिल्ह्यांतून ईडी पथकाच्या दहा गाड्या काल संध्याकाळी एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या.
Continues below advertisement