Jalgaon : राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह, जळगावात शिवराजे फाऊंडेशन तर्फे हरिनाम सप्ताह

Continues below advertisement

महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये आज दत्तजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीत दत्तजयंतीच्या निमित्तानं भक्तांचा मेळा पाहायला मिळाला. भक्तगण खूप मोठ्या संख्येनं नृसिंहवाडीमध्ये दाखल झाले होते. सलग आलेल्या सुट्ट्या आणि दत्तजयंतीच्या निमित्तानं स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे चौथे अवतार मानले जातात. त्यामुळं दत्तजयंतीसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांमधून अनेक भाविक अक्कलकोटमध्ये येत असतात. पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनंही दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यासाठी दत्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भंडारा येथील दत्त मंदिरात आज सकाळपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. भंडारा शहरातल्या मुख्य मार्गानं श्री दत्तांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दत्त संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वाशिमच्या कारंजा येथील नृसिंह सरस्वती मंदिरात दत्तजयंतीनिमित आज सकाळपासून भाविकांची गर्दी उसळली होती. जळगाव जिल्ह्यात दत्तजयंतीच्या निमित्तानं ठिकठिकाणी दत्त पारायणासह जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हजारो दत्तभक्तांनी विधिवत पूजन केलं.    

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram