Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?

Continues below advertisement

Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार? 

 आज १८ मे रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या (Gold-Silver Rate) किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही चढ-उतार सुरूच आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली धमकी, मध्य-पूर्व (मिडल-ईस्ट) भागातील तणाव आणि युद्ध न थांबण्याच्या भीतीमुळे आज देशांतर्गत वायदा बाजार (MCX) वर घसरणीसह उघडले. आंतरराष्ट्रीय बाजारात (Comex) आज सोने १% पेक्षा जास्त आणि चांदी सुमारे २.७% पर्यंत घसरली आहे. याचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजार आणि वायदा बाजार या दोन्हीवर झाला आहे. तर दुसरीकडे भारतात सोन्याच्या पाठोपाठ चांदी आयातीवर केंद्र सरकारने निर्बंध लावल्याचा तात्कालिक परीणाम म्हणून चांदीच्या दरात ७००० हजार रुपयांची दरवाढ बघायला मिळत आहे.(Gold-Silver Rate)

Gold-Silver Rate:  ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, "इराणसाठी घड्याळाची टिक-टिक सुरू झाली आहे. त्यांनी करारासाठी वेगाने पावले उचललेली बरी, अन्यथा त्यांचे नामोनिशान उरणणार नाही. वेळ खूप कमी आहे." दुसरीकडे, इराणही झुकण्यास तयार नाही. ट्रम्प यांची ही धमकी फेटाळून लावत तेहरानने (इराणची राजधानी) सांगितले की, ते कोणत्याही दबावापुढे झुकणार नाहीत. इराणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर त्यांच्यावर हल्ला झाला, तर ते मिडल-ईस्टमध्ये असलेल्या अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांच्या तळांना लक्ष्य करतील. यामुळे तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola