NIA Raid : एनआयए, एटीएससह तपासयंत्रणांची राज्यभरात पीएफआयवर पुन्हा एकदा मोठी कारवाई

Continues below advertisement

NIA Raid : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलंय. ही बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोतच. पण आज एनआयए, एटीएससह तपासयंत्रणांनी राज्यभरात पीएफआयवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केलीय. त्याची बातमी सुरुवातीला पाहुयात. एनआयएचे देशभरात छापे सुरु असताना महाराष्ट्रात ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, परभणी, जालना अशा अनेक ठिकाणी एकाचवेळी कारवाई करण्यात येतेय. पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय, तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram