Thane | गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत उन्नत मार्ग! खासदार राजन विचारेंकडून प्रस्तावित कामाची पाहणी
Continues below advertisement
ठाणे महानगरपालिकेची हद्द संपते आणि मीरा भाईंदर महापालिकेची हद्द सुरु होते त्याठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतच्या नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पहाणी आज खासदार राजन विचारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासमवेत केली. या प्रकल्पासाठी लागणारी वन खात्याची जागा मिळवून देण्यासाठी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी ही जागा महिन्याभरात मिळवून देऊ असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले. खासदार राजन विचारे यांनी येणाऱ्या नवीन वर्षात या कामाची सुरुवात करू असे सांगितले. 2017 साली या प्रकल्पाला 667 कोटींचा निधी देखील प्रशासनाने मंजूर केला होता. आता या कामास चालना मिळणार आहे. हा पूल झाल्यास संपूर्ण घोडबंदर रोड वरील वाहतूक कोंडी दूर होईल कारण त्याचवेळी ठाण्यातील इतर प्रकल्प देखील मार्गी लागतील.
Continues below advertisement