Indians and Pakistanis at Attari border : भारत-पाकिस्तानच्या नागरिकांच्या चित्तरकथा,दीड वर्षाची मुलगी भारतात, आई पाकिस्तानात
Indians and Pakistanis at Attari border : भारत-पाकिस्तानच्या नागरिकांच्या चित्तरकथा,दीड वर्षाची मुलगी भारतात, आई पाकिस्तानात
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
एक कहाणी आहे एका आई आणि मुलीची. आई पाकिस्तानी असल्यान सरकारच्या निर्देशशानुसार आईला भारत सोडावा लागलाय. पण तिच्या दीड वर्षाच्या तिची दीड वर्षाची मुलगी जी आहे ती भारतातच आहे. आई मुलीपासून दूर झाल्यान कुटुंबियानी अटारी सीमेवर आक्रोश केला.
ही बातमी पण वाचा
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतीय विमान कंपन्यांना तोटा; खर्चात दरमहा 306 कोटींची वाढ, एअर इंडियाला वर्षाला 5 हजार कोटींचे नुकसान
Pakistani airspace : पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद राहिल्यास भारतीय विमान कंपन्यांना दरमहा 306 कोटींहून अधिक अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. दुसरीकडे, एअर इंडियाने असा अंदाज लावला आहे की जर हवाई क्षेत्र एक वर्ष बंद राहिले तर त्यांना 600 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 5081 कोटी रुपयांचे नुकसान होईल. यावर मात करण्यासाठी, एअर इंडियाने सरकारला आर्थिक मदत करण्याचे सुचवलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या मते, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद केल्याच्या परिणामांवर विमान कंपन्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला त्यांचे मत आणि सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी या विषयावर चर्चा करण्यासाठी विमान कंपन्यांशी बैठक घेतली आणि परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्या सूचना मागवल्या.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर दर आठवड्याला 77 कोटी रुपये अतिरिक्त खर्च
पाकिस्तानने 24 एप्रिल रोजी भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते आणि भारताने 30 एप्रिल रोजी पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. विमान कंपन्या पर्यायी उड्डाण मार्गांवरही विचार करत आहेत. उत्तर भारतातील शहरांमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर दर आठवड्याला 77 कोटी रुपये अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि उड्डाण कालावधी देखील वाढतो. यामुळे, मंत्रालय विमान भाडेवाढीसह विमान कंपन्या आणि प्रवाशांशी संबंधित पैलूंचे मूल्यांकन करत आहे. याशिवाय, विमान कंपन्या पर्यायी उड्डाण मार्गांवर देखील विचार करत आहेत जेणेकरून उड्डाण खर्च कमी करता येईल.