Property Rights :1956 पूर्वीच्या प्रकरणातही महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क- सुप्रीम कोर्ट

Continues below advertisement

पालकांच्या मालमत्तेत महिलांच्या अधिकारासंदर्भातली महत्त्वाची बातमी. हिंदू वारसाहक्क कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे 1956 च्या आधीही महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल दिलाय. वडिलांचा मृत्यू 1956 सालापूर्वी मृत्यूपत्र न करता झाला असेल तरीही वारसाहक्क कायदा लागू असेल असं सर्वोच्च न्यायालयानं निकालात म्हटलंय. संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या एका व्यक्तीचा 1949 मध्ये मृत्यू झाला होता. या व्यक्तीनं मृत्यूपत्र केलं नव्हतं. या प्रकरणात  त्याची मालमत्ता त्याच्या भावाला नव्हे तर एकुलत्या एक मुलीला देण्यात यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. 1956 पूर्वी जरी वेगळा कायदा अस्तित्त्वात होता, तरीही त्याच्या संपत्तीवर मुलीचाच हक्क असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram