ATM Cash: आता डेबिट कार्डशिवाय कोणत्याही एटीममधून पैसे काढता येणार ABP Majha
कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवा नियम जारी केलाय. आता ग्राहक कोणत्याही एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढू शकणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी सुरु होणार आहे. कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. या नव्या नियमामुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर फसवणुकीच्या गोष्टींना आळा बसेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.