Shahrukh Khan in Delhi : शाहरुख खानची दिल्लीवारी ? छत्रीच्या मागे लपून गाडीत बसणारी व्यक्ती शाहरुख ?
आज शाहरुख खान दिल्लीत होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खासगी विमानानं शाहरुख दिल्लीला गेला होता..आणि खासगी विमानानंच तो मुंबईत परतला अशी माहिती सूत्रांनी दिली असून विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओत विमानतळाच्या गेटमधून एक व्यक्ती गाडीमध्ये बसत असल्याचं दिसतं आहे. ही व्यक्ती छत्रीच्या मागे लपून आपल्या गाडीत बसतेय, ही व्यक्ती शाहरुख खानच असल्याचं विरल भयानी यांनी म्हटलंय. शाहरुख खान कुठल्या गुप्त मिटींगसाठी दिल्लीला गेला होता का?
शाहरुख खानची दिल्लीत कुठल्या राजकीय नेत्यासोबत बैठक झाली का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.