डब्ल्यूएचओकडून कोवॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी
Continues below advertisement
हैदराबादच्या भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीची निर्मिती असलेल्या कोवॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे. कोवॅक्सिन ही भारताने बनवलेली स्वतःची कोरोना प्रतिबंधक लस आहे. जवळपास वर्षभरापूर्वीच भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी या लसीच्या भारतातील वापराला परवानगी दिली होती. ही लस भारत बायोटेक सोबत आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने एकत्रित रित्या बनवली आहे.
Continues below advertisement