Corona Vaccine Booster Dose : बूस्टर डोस देणं तात्काळथांबवा, WHO जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन

जगभरात कोरोना प्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसची चर्चा असली तरी तिसरा डोस देणाऱ्या देशांबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बूस्टर डोस देणं ताबडतोब थांबवा, असं त्यांनी म्हटलंय. अनेक देशातल्या आरोग्य कर्मचारी आणि गरजू नागरिकांना पहिला डोस मिळाला नसताना रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस देणं योग्य नाही, असं घेब्रेयेसस यांनी म्हटलंय. गरीब देशातील नागरिकांना रोज पहिला डोस दिला जातो, त्यापेक्षा सहा पट अधिक नागरिकांना बूस्टर डोस दिला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अमेरिका, जर्मनी, कॅनडा, इस्रायलमध्ये बूस्टर डोस
दिला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola