What is Bilkis Bano Case : काय आहे बिल्कीस बानो प्रकरण?, जाणून घ्या
Continues below advertisement
आता बातमी, बिल्कीस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची, सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला मोठा झटका दिला असून, गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवला. गुजरात सरकारला गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचा अधिकार नाही, कारण या प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात पार पडली होती. त्यामुळे गुजरात सरकारने शिक्षा रद्द करण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाचा सल्ला घेणं आवश्यक होतं. असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय. महाराष्ट्रात सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाच्या सल्लाने निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. दरम्यान सर्व ११ आरोपींनी २ आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत
Continues below advertisement