West Bengal train accident : मालगाडीची कंचनजंगा एक्स्प्रेसला धडक, पं. बंगालमध्ये भीषण दुर्घटना

Continues below advertisement

पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात, मालगाडीने कंचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिल्याने तीन डबे रुळावरुन उतरले, ५ प्रवाशांचा मृत्यू तर ३० जण जखमी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस (West Bengal Kanchenjunga Express train accident ) आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत.  सियालवाहकडे जाताना कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

अपघातस्थळी बचाव पथकं रवाना, ममता बॅनर्जींचं ट्विट

रेल्वे दुर्घटनेची माहिती ऐकून धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार  दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव पथकांनी धाव घेतली आहे.   बचाव पथक, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका, पोलीस आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram