West Bengal BJP Protest : Mamta Banerjee सरकारविरोधात भाजप आक्रमक, हावडामध्ये आंदोलन

Continues below advertisement

पश्चिम बंगालमध्ये भाजपानं तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. यासाठी भाजपनं ममता सरकारविरोधात नब्बान मार्च काढला. यावेळी पोलिसांनी सुवेंदु अधिकारी व लॉकेट चॅटर्जींसह अनेक भाजप नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी राणीगंज व बोलपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत चांगलीच झडप झाली. भाजपाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. बंगालच्या जनतेनं ममतांची साथ सोडलीय. त्यामुळे त्या राज्यात उत्तर कोरियासारखी हुकूमशाही राबवत आहेत अशी टीका सुवेंदू अधिकारी यांनी केलीय. भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांतो मजमूदार यांनाही कोलकाता पोलिसांनी हावडा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतलं. भाजपनं नबान्न म्हणजेच सचिवालयाला तीन बाजूने घेरण्याची योजना आखली होती. पश्चिम बंगाल विधानसभेचे १४ सप्टेबरपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळं भाजपनं या मार्चच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलाय. यात भाजपनं सत्ताधारी तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावर जोर दिलाय. सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून तृणमूलचे पार्थ चॅटर्जी व अनुव्रत मंडल हे दोन बडे नेते तुरुंगात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram