पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांची शांततेची भाषा, पाकिस्तानच्या भूमिकेचं भारताकडून स्वागत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉक्टर मोईद यूसुफ यांनी शांततेशिवाय सुरक्षित अर्थव्यवस्था शक्य नसल्याचं म्हटलंय आणि सर्वांबरोबर शांततेचे संबंध हेच पंतप्रधान इम्रान खान यांचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. भारत सरकारमधील उच्चस्तरिय सूत्रांनी एबीपीशी बोलताना पाकिस्तानची ही भूमिका सकारात्मक असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आग्रही आहेत. पाकिस्ताननं अलिकडेच दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईची दखलही भारतानं घेतली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola