WEB Exclusive : आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या भीतीने भाजपाने आपला गुजरातचा मुख्यमंत्री बदलला का?
आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या भीतीने भाजपाने आपला गुजरातचा मुख्यमंत्री बदलला का ? भाजपने रविवारी गुजरातच्या नवीन मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र भाई पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव सर्वांसाठी धक्कादायक होते. पटेल नेहमीच लो प्रोफाइल राहतात. पण पाटीदार समाजातील चांगल्या पकडीमुळे त्यांना या शर्यतीत आघाडीवर ठेवले. त्याचबरोबर त्यांचा आरएसएसशी दीर्घ संबंध आणि कार्यकर्त्यांशी सतत संपर्कही त्यांच्या बाजूने गेला.