Web Exclusive | बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी 30 सप्टेंबरला निकाल;आडवाणी, उमा भारतींसह इतरांचे काय होईल?
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.