WEB EXCLUSIVE | एमआयएम भाजपच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार
Continues below advertisement
हैदराबाद, महाराष्ट्र ,बिहारनंतर आता एमआयएम आता भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गुजरातेमध्ये निवडणूक लढवणार आहे. गुजरातमध्ये भारतीय ट्रायबल पार्टीसोबत युती करुन एमआयएम नगरपालिका निवडणुका लढवणार आहे. अहमद पटेल यांच्या निधनानंतर गुजरातमध्ये काँग्रेस पार तळाला गेली आहे. त्यामुळे तिथली मुस्लीम मतं आपल्या बाजूने घेण्याचा एमआयएमचा प्रयत्न असणार आहे. गुजरातमध्ये केवळ निवडणुका लढणार असं नाही तर जिंकणार म्हणजे जिंकणारच, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
Continues below advertisement