Republic Day : प्रजासत्ताक दिनाला विठुरायचा रंगला तिरंग्याच्या रंगात, विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट

Continues below advertisement

प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देश तिरंगी रंगात  न्हाऊन निघत असताना विठुरायाही या तिरंगी रंगात रंगला असून मंदिराला आकर्षक तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे . देवाचे पुणे येथील भाविक सचिन चव्हाण व संदीप पोकळे यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे .  तिरंग्या ची सजावट करताना झेंडू , शेवंती आणि कामिनी या फुलांचा वापर करण्यात आला आहे . यासोबत देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या अंगावरही तिरंगी उपरणे घालण्यात आले आहे . प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून केलेली ही मनमोहक सजावट 26 जानेवारीला विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram