Vinod Tawde Meet J P Nadda : विनोद तावडे भाजप अध्यक्ष नड्डांच्या निवासस्थानी
Vinod Tawde Meet J P Nadda : विनोद तावडे भाजप अध्यक्ष नड्डांच्या निवासस्थानी
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) भाजप स्वबळावर बहुमताचा आकडा पार करण्यात अपयशी ठरल्यानंतर केंद्रात एनडीए सरकार स्थापन होणार आहे. एनडीएने 18व्या लोकसभेत 293 जागा जिंकल्या आहेत. एनडीएकडून बुधवारी नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच सरकार स्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला. एनडीए विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी अधिक ताकदीने काम करेल, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांचीही शुक्रवारी बैठक होणार आहे. दुसरीकडे, नवीन सरकार कधी शपथ घेणार स्पष्ट नाही.
मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए शुक्रवारी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार 17 वी लोकसभा विसर्जित केली आहे. दरम्यान, नवीन सरकार कधी शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. शपथविधी शनिवारी होणार असल्याच्या बातम्या येत असताना, सुरक्षा आस्थापनातील सूत्रांनी सूचित केले की 8-9 जूनसाठी अद्याप कोणताही कार्यक्रम नियोजित केलेला नाही.