Vijay Mallya : विजय मल्ल्याला झटका! आलिशान घर सोडण्याचे लंडन हायकोर्टाचे आदेश

Continues below advertisement

भारताला कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये आसरा घेतलेल्या विजय मल्ल्याला लंडनमध्येही बेघर व्हायची वेळ आली आहे. लंडनमध्ये मल्या राहत असलेलं आलिशान घर सोडण्याचे आदेश लंडन हायकोर्टानं दिले आहेत. स्विस बँक यूबीएसकडे मल्यानं हा बंगला गहाण ठेवला होता. मल्यावर यूबीएस बँकेचं 2.04 कोटी पाउंड्सचं कर्ज आहे. मात्र कर्ज थकवल्यानं मल्या अडचणीत आला होता. बंगल्यातून बेदखल करू नये यासाठी मल्यानं लंडन कोर्टात धाव घेतली. मात्र यूबीएस बँकेच्या बाजूनं न्यायालयानं आदेश दिले असल्यानं आता मल्याच्या घराचा ताबा यूबीएस बँकेकडे गेलेला आहे. लंडनच्या रीजंट पार्क भागातल्या या आलीशान घरात मल्या, त्याचा मुलगा आणि त्याची 95 वर्षांची आई वास्तव्याला आहेत. मात्र कर्जबाजारीपणामुळे बेघर व्हायची वेळ त्यांच्यावर आलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram