#AyodhyaVerdict | अयोध्याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय निकाल देणार | ABP Majha
Continues below advertisement
अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. सकाळी साडेदहा वाजता या निकालाचं वाचन सुरु होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावर्षी 5 ऑगस्टपासून निकालाची नियमित सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास 40 दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.
Continues below advertisement