डिसेंबरपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचं लसीकरण करा, पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना आदेश
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस आणि लसीकरण मोहिमेवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या झालेल्या लसीकरणाची आणि लसींची उपलब्धता तसेच येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह लसीकरण मोहिमेच्या संभाव्य कालवधीची माहिती घेतली.