Uttar Pradesh Priyanka Gandhi: उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?
abp majha web team
Updated at:
21 Jan 2022 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी याच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असण्याची चर्चा रंगलीय. त्यातच प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केलंय. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी प्रियंका गांधी यांना विचारला. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून दुसरा कोणता चेहरा दिसतोय का असं उलटसवाल प्रियंका गांधी यांनी विचारला.. त्यामुळे प्रियंका गांधीच उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात.