Uttar Pradesh : IAS च्या घरी धर्मांतराचं प्लॅनिंग? योगी सरकारकडून कारवाईचे आदेश
Continues below advertisement
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मौलाना कलीम सिद्दीकीला 17 वर्षांपासून धार्मिक परिवर्तनाचे रॅकेट चालवल्याबद्दल मेरठ येथून अटक करण्यात आली होती. आता यूपीचे एक वरिष्ठ IAS अधिकारी इफ्तखरुद्दीनच्या धर्मांतराशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या व्हिडिओमध्ये इफ्ताखरुद्दीन एका धार्मिक नेत्यासह त्याच्या सरकारी निवासस्थानी, काही लोकांसमोर इस्लाम स्वीकारण्याचे फायदे सांगतांना दिसत आहे.
Continues below advertisement