UP Fire : इन्व्हर्टर वापरणाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज,इन्व्हर्टरमुळे घराला आग,एकाच कुटुंबातील 6 दगावले
Continues below advertisement
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील पाढम भागात मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागली. तळघरातील फर्निचर शोरूमला सायंकाळी 6.30 वाजता आग लागली आणि ती तिसऱ्या मजल्यावरील राहत्या घरापर्यंत पोहोचली. आगीत एक कुटुंब अडकले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तासांहून अधिक वेळ लागला. या आगीत व्यापारी कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. घरात इन्व्हर्टर बनवण्याचे काम व्हायचे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
Continues below advertisement