Gorakhnath Temple Attack : गोरखनाथ मंदिरातील सुरक्षारक्षकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ABP Majha

Continues below advertisement

 उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये गोरखनाथ मंदिरातील सुरक्षारक्षकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याचं नाव मोहम्मद मुर्तजा असं आहे. मोहम्मदने आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजीनिअरींगचं शिक्षण घेतल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, पॅनकार्ड आणि मुंबईला जाण्यासाठीचं विमान तिकीट जप्त केलंय. गोरखनाथ मंदिर परिसरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं निवासस्थान आहे. दरम्यान या प्रकरणी एटीएसने तपास सुरु केलाय. एटीएसचे पोलीस अधीक्षक गोरखपूरला पोहोचलेत.. या प्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएस टीमशी संपर्क केलाय. केंद्रीय तपास यंत्रणासुद्धा मोहम्मद मुर्तझाच्या मुंबई कनेक्शनचा तपास करतायत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram