Amit Shah | नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत संमत झालं तर गृहमंत्री अंमित शाहांवर निर्बंध? | ABP Majha

आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर आयोगानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे धोकादायक वळण असून ते संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निर्बंध घालण्याची मागणी अमेरिकन आयोगानं केली आहे. ८ तासांच्या वादळी चर्चेनंतर काल मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झालं. ते उद्या राज्यसभेतही मांडले जाणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola